Categories: क्राईम

यवतजवळ लॉजवर वेश्या व्यवसाय, दोघांना अटक

दौंड : यवत जवळ असणाऱ्या बोरीभडक येथील एका लॉजवर अवैध वेश्याव्यवसाय होत असताना यवत पोलिसांनी छापा टाकुन मोठी कारवाई केली आहे.

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे गावचे हद्दीत सोलापुर – पुणे रोड लगत असलेल्या असलेल्या जॉली लॉजवर महिलांकडुन वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी त्यांच्या स्टाफ व पंचांना घेवुन बनावट गिन्हाईक पाठवुन सदर लॉजवर छापा टाकला असता तेथे हा व्यवसाय करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या छाप्यात आरोपी १) प्रभाकर गुलाब मदने, (वय ३६ वर्षे, रा.भोसरी गव्हाणेवस्ती, जि. पुणे मुळ रा. बोरी पोस्ट नारंगवाडी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) २) उमेश ब्रम्हा शिंदे, (वय ३५ वर्षे, रा. उरूळीकांचन आश्रम रोड ता. हवेली, जि. पुणे) हे एक महिलेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असताना मिळुण आले. त्याबाबत आरोपींविरूध्द यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ९२४/२०२२, भा.द.वि.
कलम ३७० (२) स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५,८
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकुण आला असुन एकुण ९०,४५० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गुन्ह्याचा सदर पुढील तपास पोलीस
उपनिरीक्षक पी.आर.गंपले हे करीत असून
सदरची कामगिरी अंकित गोयल, (पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण)
मिलिंद मोहिते, (अपर पोलीस अधीक्षक, बारामती) गणेश इंगळे, (उपविभागीय
पोलीस अधिकारी, बारामती विभाग) अतिरिक्त कार्यभार दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, (यवत पोलीस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक पी. आर. गंपले, पो.ना. गोसावी, पो.ना / काळे, पो.ना / गायकवाड, पो.ना / रणदिवे, पो.कॉ/ननवरे, मपोना / चाफळकर यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago