दौंड च्या प्रा.डॉ. भिमराव मोरे यांना विशेष साहित्य सेवा पुरस्कार

दौंड : (अख्तर काझी) मराठी राजभाषा दिनानिमित्त फलटणच्या ॲग्रो न्युज पवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा विशेष साहित्य सेवा पुरस्कार दौंडच्या प्रा. डॉ.भिमराव मोरे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.

ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या आठव्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे होते. स्वागताध्यक्ष श्रीमंत सुभद्राताई निंबाळकर, संमेलनाध्यक्ष सोनाली ढमाळ, कार्याध्यक्ष निलम पाटील, संयोजक प्रकाश सस्ते, प्रा. विजय काकडे,साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, सिताराम नरके, दिलीप सिंह भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट व समाजोपयोगी लेखन करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. भीमराव मोरे यांच्या “तीन चाकांवर चार भिंतींचा संसार”या पुस्तकाला विशेष साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे प्रा. डॉ.भिमराव मोरे हे रिक्षा चालक व मालक यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर पीएच.डी करणारे महाराष्ट्रातील पहिले प्राध्यापक आहेत. रिक्षा चालकांसाठी अविरतपणे कार्य करून त्यांना सामाजिक प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. याचाही उल्लेख या संमेलनात करण्यात आला.