पंतप्रधान मोदींच्या मातोश्री ‘हिरा बेन’ यांचं ‘निधन’

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिरा बेन यांचं शंभराव्या वर्षी निधन झालं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदरणीय माताजी हीरा बा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आई ही माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि गुरू असते, जिला गमावल्याचे दुःख हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, हिरा बा यांनी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचे बलिदान जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील.या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या परिवारासोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. ओम शांती

हिरा बेन यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. आज पहाटे 3:30 दरम्यान त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.