Categories: विदेश

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमुळे देशातील श्रद्धांळुंमध्ये भीतीचे वातावरण! वाचा कोण आहे बाबा वेंगा आणि त्यांची भविष्यावाणी

बाबा वेंगा ही अशी व्यक्ती जिने विज्ञान युगात हजारो वर्षांचे भविष्य कथन करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी केलेल्या भविष्यावाणी अनेकदा खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी सध्याचे रशिया म्हणजे त्यावेळचे सोव्हिएत युनियन याचं विघटन होईल, ओसामा बिन लादेन याची अल-कायदा संघटना अमेरिकेवर दहशतवादी करेल अशी त्यांनी अनेक भाकितं केली होती आणि ती खरी ठरली हे विशेष. बल्गेरियातील अंध असलेले बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर जगात अनेकजण विश्वास ठेवतात. त्यातच बाबा वेंगा यांनी 2022 सालासाठी अनेक भयंकर भाकितं वर्तवली व त्यानंतर आता 2023 सालासाठी त्यांनी कोणती भाकितं वर्तवली आहेत हे आपण पाहू..

2023 साठी बाबा वेंगा यांनी भारताबाबत केलेलं भाकितं लोकांच्या मनात भय निर्माण करत आहेत. चला जाणून घेऊया बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी भारताबद्दल काय भाकीत केलं आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केलं आहे की 2023 मध्ये जगातील तापमान कमी होईल, ज्यामुळे टोळधाड येईल.

अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला करतील. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होईल. परिणामी, भारतात दुष्काळाची परिस्थिती ओढवेल किंवा उपासमारीची परिस्थिती निर्माण होईल. बाबा वेंगा यांनी वर्तवलेलं हे भाकीत खरं ठरल्यास देशावर मोठं संकट येऊ शकतं यात शंका नाही.

याआधी बाबा वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट आहे.  2023 वर्ष जगासाठी ठरणार अतिशय भयंकर, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं.

पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांना त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला होता. 1950 च्या दशकानंतर या देशांमध्ये पाऊस कमी पडतोय, त्यामुळे इथे दुष्काळजन्य परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागतोय. बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं, की या वर्षी आशियातील काही देश व ऑस्ट्रेलियामधील काही भागात पूर येईल. त्याशिवाय भूकंप व त्सुनामीचं भाकितही त्यांनी वर्तवलं होतं.

त्यानुसार, या वर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात हाहाकार माजला. बांगलादेश, भारताचा ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमधील लोकांनाही पुराचा फटका बसला आहे. यावरून बाबा वेंगा यांचं हे भाकीतही खरं ठरलं होतं हे दिसतं

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago