‛प्रधानमंत्री आवास’ योजनेबाबत आता मोठी माहिती आली समोर, ‛या’ तारखेपासून सुरू होत आहे ‛ग्रामीण महाआवास’ अभियान

मुंबई : आपले स्वतःचे एक छोटेसे मात्र चांगले (पक्के) घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते मात्र पैसे, ऐपत नसल्यामुळे ही अनेकांची इच्छा फक्त स्वप्नच बनून राहते. परंतु सर्वसामान्यांचीही ही इच्छा आता लवकरच पूर्ण होईल असे दिसत आहे. कारण केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवासयोजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांच्या गतिमानतेसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ‘महा आवास अभियान – ग्रामीण २०२१-२२’ राबविण्यात येणार आहे आणि त्यामुळे स्वतःचे, हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

या अभियानाबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार असून अभियान कालावधीत पाच लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच या संदर्भातील शासननिर्णय जारी झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

या योजनांमुळे विविध शासकीय योजनांच्या कृतीसंगमातून लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे आणि या अभियान कालावधीत पाच लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवला असून त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील गरजवंतांना होणार आहे. आपले स्वतःचे, हक्काचे पक्के घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते मात्र ही इच्छा पूर्ण होता होता संपूर्ण आयुष्य निघून जाते. आता सरकारच्या मदतीने जनतेचे हे स्वप्न काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.