| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास 4 ते 5 खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र यातील एक कोविड सेंटर स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरीक करू लागले आहेत.
हे कोविड सेंटर केडगाव-बोरीपार्धीच्या हद्दीत लोकवस्तीमध्ये असून या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना वापरण्यात येत असलेले पीपीई किट, तोंडाचे मास्क हे अक्षरशा रस्त्यावर फेकून देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप येथील रहिवासी करत आहेत आणि त्याची सत्यता वरील फोटोमध्ये सुद्धा दिसून येत आहे.
वास्तविक पाहता कोरोना रुग्णांनावर उपचार करताना वापरण्यात येत असलेले पीपीई किट, मास्क आणि हॅन्ड ग्लोज हे एखाद्या मोठ्या पिशवी अथवा बॅगेमध्ये टाकून खूप सावधागिरीने ते लोकवस्तीपासून दूर नेऊन त्याचा नाश केला पाहिजे मात्र याठिकाणी असली कोणतीच सावधगिरी बाळगली जात नसून हे पीपीई किट, मास्क आणि हॅन्डग्लोज अक्षरशा डस्टबिन च्या बाहेर रस्त्यावर फेकले जात असल्याने येथील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत कोविड सेंटर चालवत असलेल्या संचालकांनी आणि त्यावर होल्ड असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून हा प्रकार लागलीच थांबवावा अशी मागणी येथील रहिवासी करीत असून जर हा प्रकार थांबला नाही तर संबंधित खात्याकडे याबाबत तक्रार करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.