मुंबई : सहकारनामा
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या प्रकरणी एका मंत्र्यांचे नाव पुढे येत असल्याने आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या आत्महत्येबाबत विरोधात आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर ताशेरे ओढल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील माहिती घेतल्याचे समजत असून संबंधित मंत्र्यांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
पुणे शहरामध्ये बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर या प्रकरणातील पूजा चव्हाण संबधीत 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपमध्ये एका मंत्र्याचा आवाज असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्रं पत्रव्यवहार करून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तर चित्रा वाघ यांनी थेट त्या मंत्र्यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या मंत्र्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.