दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील सर्वात मोठी चुरस ठरलेली यवत ग्रामपंचायतीची निवडणूक आता सरपंच पदावरून आणखीनच चुरशीची बनली आहे.
यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुल गटाला 8 तर थोरात गटाला 9 जागा मिळाल्या होत्या. ही ग्रामपंचायत थोरात गटाकडे जाणार असे चित्र असतानाच आता यातील दिग्गज मंडळींना डावलणे थोरात गटाच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.
थोरात गटाचे दोन प्रमुख सदस्यच कुल गटात गेल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत असून आता यवत ग्रामपंचायतीवर कुल गटाचा झेंडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वेळातच याबाबत अधिकृत घोषणा होणार असून मिळत असलेल्या माहितीनुसार यावेळी कुल गटाचे पारडे जड झाल्याचे पाहायला मिळत आहे.