Categories: Previos News

Political : ग्रामपंचायत निवडणुकीचा दौंडमध्ये बोजवारा, कोरोनाला गर्दीने चिरडून मारण्याची दौंडमध्ये मोहीम!



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

गाव गाडा नेमका कोणी चालवायचा याच्या साठीची निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीच्या फडाची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या अनुषंगाने दौंड तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या  निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज  दि. 30 शेवटचा दिवस असल्याने येथील तहसील कार्यालय परिसरात अक्षरशः जत्रा भरल्यासारखी गर्दी पहायला मिळाली. 

कोरोना संसर्गाची भीती अद्याप संपलेली नाही त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, महामारी पासून बचावासाठी च्या उपाययोजनांची अंमलबजावणी लोकांनी काटेकोरपणे करावी असे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री वारंवार करीत आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळणे,मास्क वापरण्यासाठी शासनाकडून आजही  जनजागृती  केली जात आहे. 

मात्र या निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांनी शासनाच्याच समोर कोरोना ला अक्षरशः चिरडून मारण्याची  मोहीम राबविली आहे  कि काय? इतकी गर्दी येथील तहसील कार्यालयात दिसून आली. त्यामुळे शासनाच्या कोरोना महामारी पासून बचावासाठी च्या आवाहनाचे सुज्ञ नागरिकांनी तीन -तेरा वाजविल्या चे स्पष्टपणे दिसत आहे. आणि हा सर्व  प्रकार चालू असताना शासनाचे जबाबदार अधिकारी सुद्धा गप्प राहणे पसंत करतात याचे आश्चर्य वाटते. 

प्रत्येक समाजाचे सण, उत्सव, महापुरुषांची  जयंती शासनाने गर्दी न करता साजरी करावयास लावली, मग  याच निवडणुकां दरम्यान शासनाला कोरोना महामारी चा विसर का पडला आहे याचे उत्तर कोणाकडे नाही. शासनाच्या साक्षीने नागरिकांच्या आरोग्याचा येथे खेळ होताना दिसतो आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago