Categories: Previos News

Political : भांडगावची निवडणूक बिनविरोध होऊ शकते! पण..



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुक ही बिनविरोध करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. येथे कुल-थोरात हे दोन प्रबळ गट आहेत आणि या गटांमध्ये गावाच्या वर्चस्वावरून अनेकवेळा हाणामाऱ्या झाल्या आहेत. मात्र तरीही आता दोन्ही कडील जेष्ठ आणि राजकीय  जाणकार मंडळींनी  हि ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि हे प्रयत्न यशस्वी झाल्यास याचा मोठा संदेश संपूर्ण तालुक्यात जाणार आहे.

पण इमान इतबारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच डावलून जर दोन्ही गटातील काही मंडळी आपसात बसून हि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रयत्न कसा यशस्वी होईल अशी शंका भांडगाव ग्रामपंचायतीला इच्छुक असणारे उमेदवार रामदास दोरगे यांनी व्यक्त केली आहे.

भांडगाव ग्रामपंचायत निवडणूक असो वा अन्य कोणतीही निवडणूक असो येथे संघर्ष हा अटळ होता मात्र दोन्ही कडील नेत्यांनी हा संघर्ष टाळून आता गावचा विकास कसा होईल याकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि त्याचेच फलित म्हणून हि निवडणूक बिनविरोध होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

मात्र जो पर्यंत येथील गावपातळीवर  काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य समजले जात आहे. 

आम्ही निवडणूक बिनविरोध याच मनस्थितीचे असून जो गाव आणि आमचे जेष्ठ सहकारी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मत इच्छुक उमेदवार रामदास दोरगे यांनी व्यक्त केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago