Categories: Previos News

Political : दौंड का ग्रामपंचायत ‛किंग’ कौन? कुणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती?? आरक्षण जाहीर होताच तालुक्यात पुन्हा राजकीय वातावरण तप्त



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतींवर बहुमत कुणाचे? कुणाकडे असणार सर्वात जास्त ग्रामपंचायती? याबाबत आता तालुक्यात तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. प्रत्येकजण म्हणतो तालुक्यात ग्रामपंचायती आमच्याच जास्त! मात्र आता आरक्षण जाहीर झाले आणि राजकीय खेळीला सुरुवात झाली आहे.

नुकत्याच दौंड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडून निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजप ने आपल्या कमीत कमी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असून राष्ट्रवादीच्या पारड्यात जास्तीत जास्त 17 ग्रामपंचायती असल्याचे जाहीर केले होते. याबाबत त्यांनी पुरावा म्हणून आलेल्या ग्रामपंचायतींची नावे आणि आकडेवारीही जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादीने या आकडेवारीला हरकत घेत आपल्या 30 च्या पुढे ग्रामपंचायती आल्या असून भाजप खोटी आकडेवारी देत असल्याचे सांगितले आहे. तर शिवसेनेही या तर्कवितर्कच्या राजकीय आखाड्यात उडी घेत आपले 30 सदस्य निवडून आले असून ऐनवेळी आपली ताकद दाखवून देऊ असे म्हणत भाजप, राष्ट्रवादीला आव्हान उभे केले आहे.

हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना नेमक्या कुणाच्या किती ग्रामपंचायती आल्या? हे सर्वसामान्य नागरिकांना मात्र उलगडत नव्हते. आता मात्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून लवकरच तालुक्यात कुणाच्या किती ग्रामपंचायती आल्या हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दौंड का ‛ग्रामपंचायत किंग’ कौन याचेही उत्तर लवकरच मिळेल यात शंका नाही.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago