Categories: Previos News

Political – निवडणूक कामात हलगर्जीपणा! शिक्षकावर कारवाईसाठी तहसीलदारांकडून गटशिक्षणाधिकारी प्राधिकृत



दौंड : सहकारनामा(अख्तर काझी)

निवडणुक कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिक्षकावर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक 2 अ चे मतदान केंद्राध्यक्ष  नानासाहेब रामचंद्र शिंदे हे मतदान अधिकारी 1 यांच्या जागेवर बसून होते तसेच एका महिलेचे मतदान त्यांनी स्वतः जाऊन केले असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या आरोपानंतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी समक्ष जाऊन पाहणी करून जबाब घेतले तसेच झोनल अधिकारी श्रीमती निर्मला राशिनकर यांनीही या घटनेचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला होता. तसेच सोनवडी ग्रामपंचायतीचे  निवडणूक निर्णय अधिकारी ना.ल.सासवडे यांनी ही तहसीलदार दौंड यांना दिलेल्या पत्रात नानासाहेब शिंदे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे लिहिले आहे. तहसीलदार यांनी नानासाहेब रामचंद्र शिंदे यांचा खुलासा  मागविला होता. त्यानुसारपाटील यांनी शिंदे यांचा खुलासा अमान्य करत त्यांनी निवडणूक कामात व शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-1958 अन्वये व प्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार कारवाई करण्यासाठी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 

तसेच नानासाहेब शिंदे हे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात पॅरोलवर असतानाही दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी त्यांची माहिती निवडणूक आयोगाला कळविले असल्याने त्या विरोधातही दौंड तालुका कला व वाणिज्य प्राचार्यांच्या चौकशीचे आदेश तहसीलदार यांनी गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना दिले आहेत.

दरम्यान मतदान प्रक्रियेत स्वतः जाऊन मतदान करणे तसेच निवडणूक आयोगाला खोटी माहिती देणे या दोन्ही गंभीर बाबी असल्याने याबाबत गटशिक्षणाधिकारी आता काय गुन्हा दाखल करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे ?

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago