दौंड : सहकारनामा
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज चौफुला ता.दौंड येथील शिवसेना कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी केले.
यावेळी खा.संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील शिवसेनेची पक्षबांधणी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे होत असलेला जनता दरबार व शिवसैनिकांकडून होत असलेली कामे याचा आढावा घेतला. खा.संजय राऊत यांनी या प्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक प्रभाकर पवार, उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवा सेना तालुका समन्वयक समिर भोईटे, पडवी ग्राप सदस्य दत्तात्रय चव्हाण, रोटी गावचे माजी सरपंच दीपक भंडलकर, कार्यालयीन प्रमुख प्रशांत खराडे, शिवसेना रोटी शाखाप्रमुख गणपत शितोळे, संदीप कडू, शुभम माळवे, किरण वाघमारे रावणगावचे शाखा प्रमुख सुनिल थोरात व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.