Political – युवासेना वाढीसाठी कटिबद्ध : राज्य युवासेना विस्तारक गणेश कवडे



दौंड : सहकारनामा

युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सूचनेवरून राज्य युवासेना विस्तारक गणेश कवडे यांनी आज चौफुला ता.दौंड येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला बैठकीनिमित्त भेट दिली.

यावेळी गणेश कवडे यांच्या उपस्थितीमध्ये दौंड विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आढावा व निवड बैठक शिवसेना दौंड विधानसभा मध्यवर्ती कार्यालय चौफुला या ठिकाणी पार पडली. 

या बैठकीसाठी युवासेना जिल्हा युवाअधिकारी सचिन पासलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, युवासेना उपजिल्हाधिकारी बाळकृष्ण वांजळे, शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, युवासेना तालुका प्रसिद्धी अधिकारी निलेश मेमाणे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख वैभव शितोळे, योगेश फडके, समीर भोईटे, निरंजन ढमाले, सागर आव्हाड, हरी फडके इ. युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती लोकसभा राज्य विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना दौंड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महेश पासलकर यांच्या हस्ते कवडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन पासलकर यांनी युवा सैनिकांना मार्गदर्शन केले. 

यावेळी बोलताना राज्य विस्तारक गणेश कवडे म्हणाले की मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देतो युवासेना पदाधिकारी निवडी येत्या पंधरा दिवसात होतील, पदाला न्याय देणाऱ्या युवा सैनिकांनीच पदासाठी आग्रही रहावे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा कार्य अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी घेतला जाईल. संघटना चोवीस तास कार्यरत ठेवण्यासाठी मी दौंड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक पदाधिकारी साठी चोवीस तास उपलब्ध असेल. संघटना वाढीवर पदाधिकाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होईल असे सांगून युवा सेना ही शिवसेनेचे मुख्य अंगिकृत संघटना आहे त्यामुळे युवा सेना आणि शिवसेना  मिळून दौंड विधानसभेवर भगवा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मान्यवरांचे स्वागत निलेश मेमाणे यांनी केले, प्रास्ताविक समीर भोईटे यांनी केले तर आभार शिवसेना दौंड शहरप्रमुख आनंद पळसे यांनी केले.