Categories: Previos News

Political – यवत मधील अतिक्रमण ठरतेय प्रचारात कळीचा मुद्दा.. कुल गटाच्या आरोपांनी थोरात गट बेजार, अतिक्रमण काढण्याचे थोरात गटाच्या सरपंचांचे पत्र थेट जाहीरनाम्यात



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या अतिक्रमण हा कळीचा मुद्दा बनला आहे. हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजत असून हा मुद्दा थेट जाहिरनाम्यात छापून आल्याने यवत मधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

यवतमध्ये कुल आणि थोरात हे दोन गट प्रबळ आहेत आणि दोन्ही गटांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

ही निवडणूक कुलगटाचे सुरेश शेळके, बाळासाहेब लाटकर, नानासाहेब दोरगे, शब्बीरभाई सय्यद यांसह मान्यवरांकडून काळभैरवनाथ पॅनल तयार करून लढवली जात आहे. तर तब्बल 10 वर्षे या ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ असणारे थोरात गटाचे नेतृत्व कुंडलिक खुंटवड, रामदास दोरगे, सदाशिव दोरगे हे करत असून त्यांनी यवत विकास आघाडी पॅनल बनवले आहे.

यवत येथील शासकीय जागेतील भूमिहीन अतिक्रमणे व लोकांची घरे नियमित करण्यासाठी यवतच्या व इतर भागातील लोकांची मागणी लक्षात घेता आमदार राहुल कुल यांनी ही घरे नियमित करण्यासाठी सभागृहात मागणी केली होती मात्र यवत येथील ग्रामपंचायतीने ही अतिक्रमणे त्वरित थांबवून काढून टाकण्याचा पत्र व्यवहार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला PMRDA ला केला आहे असा आरोप कुल गटाकडून करण्यात येऊन हा पत्रव्यवहाराचा पुरावा थेट त्यांनी जाहीरनाम्यात छापल्याने आता थोरात गटाला याचे उत्तर देताना चांगलीच दमछाक होत आहे.

सध्या कुल आणि थोरात गटाने आपापल्या परीने मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सध्या दोन्हीबाजूने मजबूत प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, यातच आता कुल गटाने सर्वसामान्य भूमिहीन लोकांची घरे वाचविण्याची मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. आमची सत्ता आली तर एकाही गरीबावर, भूमिहिनावर आम्ही अन्याय होऊ देणार नसल्याचे कुल गट ठामपणे सांगत आहे. तर यवतच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या असे थोरात गट म्हणत आहे.

अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्याबाबत मा.सरपंचाच्या वतीने खुलासा..

अतिक्रमण काढण्याच्या पत्राबाबत विरोधक आपल्या सोई प्रमाणे अर्थ लावून त्याचा निवडणूक प्रचाराच मुद्दा बनवत आहेत. ही खरी वस्तुस्थिती नसून आम्ही सर्व लोकांना घरे मिळावी, त्यासाठी जागा उपलब्ध राहावी आणि त्या जागेमध्ये अधिकचे अतिक्रमण न होता pmrda चे काम होऊन सर्वांना समान घरे मिळावी यासाठी तो पत्र व्यवहार केला असल्याचे त्यांनी खुलासा केला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago