Categories: राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्लेक्सवर ठराविक चेहरेच का! अन्य चेहरे घेण्याची लाज वाटते का? संतप्त कार्यकर्त्यांची भावना

अख्तर काझी

दौंड : हिंदू ,मुस्लिम, शीख, ईसाई…. हम सब भाई -भाई म्हणत संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा शहरात मशाल यात्रा अभियान राबविले. या उपक्रमाची जनजागृती व्हावी, सर्व समाजाने यामध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यासाठी पक्षाच्यावतीने पक्षातील पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले फ्लेक्स शहरात लावण्यात आले होते.

मात्र या फ्लेक्स वर एकही मुस्लिम पदाधिकाऱ्याचा चेहरा घेतला गेला नाही. त्यामुळे पक्षाच्या फ्लेक्सवर मुस्लिम चेहरे घेण्याची पक्षाला आता लाज वाटत आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या राष्ट्रवादीला याचे काहीच कसे वाटत नाही किंवा वाटले नाही असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून दौंड शहरातील बहुतांशी मुस्लिम समाज नेहमी मा. शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्यामुळे या पक्षाकडून समाजाला मिळणारी ही वागणूक योग्य नाही, व ती पवार साहेबांना अभिप्रेतही नाही.

कोणतीही निवडणूक असो शहरातील मुस्लिम समाजाचे दोन नेते, बादशाह शेख आणि सोहेल खान मुस्लिम समाजातील जास्तीत जास्त मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशी मिळतील यासाठी जीवाचे रान करताना दिसतात. पक्षाला वेळी वेळी योगदान दिल्यानंतरही या दोघांच्या फोटोंची दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकी एलर्जी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे का या दोघांना फक्त मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठीच वापरावयाचे ठरविले आहे का, दौंड राष्ट्रवादीने यांना व समाजाला जणू गृहीतच धरले आहे. कोठे जाणार जाऊन -जाऊन, पाच ,सहा दिवस पक्षावर तोंडसुख घेतील, घेतलीच तर एखादी पत्रकार परिषद घेतील आणि आठव्या दिवशी पुन्हा घर वापसी करतील असा यांचा आजवरचा अनुभव पक्षाला आहे.

कोणीही स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजू नये असा संदेशही पक्षाने वेळोवेळी दिलेला आहेच. त्यामुळे आपल्या नेत्यांचे फोटो फ्लेक्स वर नाहीत हे पाहून संतापलेल्या कार्यकर्त्यांना नेहमीप्रमाणे गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. अरे पण का इतकी लाचारी, कोणासाठी? आणि का म्हणून हा प्रश्न अनुत्तरीतच. आणि झालेल्या या प्रकाराबाबत पक्षामध्ये काही चर्चा होईल याची शक्यताही धुसरच.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

14 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

23 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

3 दिवस ago