भीमा पाटसला कमी पडले ‘का’व‘ळे’ चे ‘चाळे’ म्हणून की काय रचले त्यांनी हे राजकारणाचे नविन ‘जाळे’

दौंड : दौंड तालुक्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमा पाटस ला टाळे लागावे म्हणून दिवसरात्र प्रयत्न करणाऱ्या काही महाभागांपैकी एका ‘का’व‘ळे’ ने काही महिन्यांपूर्वी समविचारी लोकांशी हात मिळवनी करून मोठे षडयंत्र रचल्याचे आता त्याचे निकट वर्तीय बोलू लागले आहेत. त्यामुळे ‘कमी पडले ‘का’व‘ळे’ चे चाळे म्हणून की काय रचले त्यांनी मृत्युंच्या राजकारणाचे जाळे’ अशी म्हणायची वेळ आता शेतकरी, सभासदांवर आली आहे.

काहीतरी करून कुणाला तरी बदनाम करण्यासाठी आणि त्या आडून राजकारण करण्यासाठी कावळे नी अगोदरपासून प्रयत्न सुरु केल्याची गोपनीय माहिती आता समोर येऊ लागली आहे. कारखाना प्रशासन बदनाम करण्याची नेमकी वेळ आली असताना अचानक बैठकीचा पर्याय समोर येऊन त्यातून मार्ग निघत आहे असे दिसताच कावळे पुन्हा वेगळा मुद्दा घेऊन पूढे आले आणि ‘आता कसं आम्ही ठरवलं तसं’ म्हणतं पुन्हा एकदा आपले राजकीय चाळे सुरु केले. अन्य लोकांच्या तोंडी आलेला सुखद घास हा आपल्या हेकेखोर प्रवृत्तीने पुन्हा दूर नेल्याची चर्चा आता खुद्द त्यांच्यासोबत असणारे करू लागले आहेत.

मी पणा आणि वात्रट टिका यात पटाईत असणाऱ्या कावळेनी सर्वांसाठी आलेले चांगले पर्याय का नाकारले हे आता त्यांच्या प्रचार यंत्रनेवरून दिसू लागले आहे. कुणाला तरी पाडायचे म्हणून प्रचार धुरा खांद्यावर घेतलेल्या कावळेनी आत्तापर्यंत विविध प्रयोग केले आहेत. त्यातून स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्यांच्या मृत्युंचे राजकारण हे मानवतेला न शोभणाऱ्या गोष्टीही कावळे यांनी मोठ्या हुशारीने करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऐनवेळी सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने कावळे तोंडघशी पडले आणि पुन्हा एकदा खरं समोर आणणाऱ्यांच्या नावाने बोंबा मारू लागले.

इतके करूनही आता आपल्या हाती काही लागत नसल्याचे पाहून कावळे नी सध्या एक डोम कावळा लिखाण बहाद्दर आपल्या जवळ केला आहे. त्यातून त्या डोम कावळ्याने दररोज चाकरी केल्याप्रमाणे वयक्तिक टिका टिप्पनी, खालच्या दर्जाची टिका आणि कोर्टात मानहाणीचा दावा दाखल होईल असे लिखाण करून अनेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. एका लिहिलेल्या पोस्ट चा रेट 300 रुपये रोख अण दोन वेळचे ढाब्यावरील जेवण फुकट असा काहीसा स्वतःचा रेट ठरवून घेतल्याची माहितीही लोकांच्या चर्चेतून समोर येत आहे. त्यामुळे उसाचा रस ओढ्याला सोडण्याच्या कांडामध्ये कावळे सुद्धा होते का याचीही चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.