Categories: Previos News

Political – बेईमाणीने तयार झालेलं तुमचं हे सरकार आधी चालवून तर दाखवा : उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत विविध पातळीवर गाजत असताना आणि त्यावर आरोप प्रत्यारोप होत असताना आता आणखीन एक नवीन मुद्दा जोर धरू लागला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मी इथे बसलेलोच आहे. माझं सरकार पाडून दाखवाच असे जे आव्हान विरोधकांना केले होते त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाला उत्तर देताना अगोदर सरकार चालवून तर दाखवा ते पाडायचं नंतर पाहू असा टोला हाणत आम्हाला तुमचं सरकार पाडण्यात रस नाही ते अंतर्गत विरोधानेच पडणार आहे. कारण ते बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. त्यामुळे राज्यात या सरकारचं अस्तित्वच नाही. असा हल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रति आव्हान देताना केला आहे. 

मुंबईत झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. मात्र हे आरोप प्रत्यारोप करताना आम्ही कोरोनाच्या लढाईत या सरकार सोबत आहोत, असे म्हणत क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांसोबत जे काही अत्याचार सुरू आहेत याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि  यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलावी लागतील याबाबत काही सूचना केल्या.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago