Categories: Previos News

Political – दौंड ग्रामपंचायत धमाका : तालुक्यातील राष्ट्रवादी युवकच्या उपाध्यक्षाने आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढवले, या गोष्टीमुळे दोन्ही गटांत खळबळ



पुणे : सहकारनामा (अब्बास शेख)

दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली.

अनेक ठिकाणी उमेदवार फायनल करताना कुल-थोरात गटाच्या गाव प्रमुखांची पुरती भंबेरी उडाली. मात्र तरीही ज्या इच्छुक उमेदवारांना दोन्ही गटांनी डावलले त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे या दोन्ही गटांच्या उमेदवारांना चेक देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

असाच काहीसा प्रकार 

दौंड तालुक्यातील भांडगाव या ठिकाणी पहायला मिळत असून येथील इच्छुक उमेदवार रामदास अशोक दोरगे या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल करून दोन्ही गटांमध्ये धमाका उडवून दिला आहे. विशेष म्हणजे रामदास दोरगे हे दौंड तालुका राष्ट्रवादि युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असून त्यांनी माजी सभापदी आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर दोरगे यांच्या वार्डमधून फॉर्म भरला असून त्या वार्डमध्ये मधुकर दोरगे यांचे संतोष दोरगे हे निवडणूक लढवणार आहेत.

रामदास दोरगे यांनी यावरच न थांबता आपल्या छापलेल्या स्टिकरमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात या दोघांचे फोटो टाकल्याने दोन्ही गटांत खळबळ माजली आहे.

याबाबत रामदास दोरगे यांच्याशी संपर्क साधला असता कुल-थोरात हे दोन प्रबळ गट भांडगावमध्ये कार्यरत असून या दोन्ही गटांतील कार्यकर्ते आणि प्रमुखांनीच गावाच्या बाहेर हाथमिळवणी करत वार्ड वाटून घेत सदस्य पदे पदरात पाडून घेण्याचा डाव सुरू केला आहे. मात्र यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठेही विचारात घेतले गेले नसून  ज्या बैठका गावात व्हायला हव्या होत्या त्या गावाच्या बाहेर झाल्याने माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांमध्ये डावलले गेल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे आम्ही हि ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच स्टिकरवर टाकण्यात आलेल्या फोटोबाबत त्यांनी माहिती देताना मी आमदार राहुल कुल यांचे सात ते आठ वर्षे काम केले आहे आणि आजही माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत तसेच मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष असून मी राष्ट्रवादीचा पदाधिकरी असल्याने माजी आमदार रमेश थोरात तसेच इतर मान्यवरांचे फोटो टाकले असल्याचे  त्यांनी सांगितले.

दौंड तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू झाल्याने दोन्ही पारंपारिक गटांमध्ये नाराज कार्यकर्ता फुटफुटीला उधाण आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago