Political – खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ.कुल गट (भाजप) च्या कु.स्नेहल काळभोर यांची निवड!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोर यांची बिनविरोध निवड झाली असून याची अधिकृत घोषणा दुपारी 2 वाजल्यानंतर होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोरखनाथ मोहिते यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.

स्नेहल काळभोर यांनी आपला सरपंचपदासाठीचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत कोणताही अर्ज दाखल झाला नव्हता,  त्यामुळे त्यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी राहुल संभाजी गुणवरे यांची बिनविरोध निवड झाली असून याबाबत औपचारिक घोषणा बाकी आहे.

कु.स्नेहल काळभोर या मा.जिल्हापरिषद सदस्य संजय काळभोर यांच्या कन्या असून त्यांचे BCA पर्यंत शिक्षण झाले आहे.

या निवडणुकीत कुल गट (भाजप) च्या सर्वच कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले असून जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करू असे आश्वासन सरपंच स्नेहल काळभोर यांनी उपस्थितांना दिले आहे.