Political – पडवीच्या सरपंचपदी नागेश मोरे यांची बिनविरोध निवड



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील पडवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागेश मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पडवी येथे कुल आणि थोरात असे दोन प्रबळ गट आहेत. निवडणूक झाल्यानंतर येथील सरपंचपद हे अनुसूचित जातीला राखीव झाले होते, त्यामुळे दोन्ही गटांमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अगोदर उपसरपंचपदी गणेश बारवकर यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर मात्र दोन्ही गटांतील सदस्य आणि गाव पातळीवरील नेत्यांनी  एकत्र येत सरपंचपदी नागेश मोरे यांना बिनविरोध निवडून देण्याचे ठरवले.

त्यानुसार दि.12 मार्च रोजी हि निवडणूक प्रक्रिया दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी एम. व्ही गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेत फक्त नागेश मोरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन नव निर्वाचित सरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत सदस्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नव निर्वाचित सरपंच नागेश मोरे, उप सरपंच गणेश बारवकर, अनिल शितोळे, प्रमोद शितोळे, राजेंद्र शितोळे, शितल शितोळे, जयश्री कुदळे, उर्मिला गायकवाड, मंजुषा जगताप, शुभांगी चव्हाण व ग्राम विकास अधिकारी दुरगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.