– सहकारनामा
मुंबई : भाजप आणि शिवसेना हे अगोदर पक्के मित्र समजले जात होते मात्र या मित्रांमध्ये दुरावा निर्माण होऊन आता त्यांच्यामध्ये राजकीय चढाओढ लागल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारला घेरण्यात भाजपने कुठलीही कसर ठेवली नसताना आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे.
शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
सेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या तृप्ती सावंत या पत्नी आहेत, बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्या शिवसेनेच्या आमदार झाल्या होत्या.