Police Sucide – आत्महत्या केलेल्या ‛त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचा ‛डान्स’ व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहून आत्महत्येवर विश्वास बसणार नाही!
दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील केडगाव येथील नाना हंडाळ या पोलीस कर्मचाऱ्याने शिवाजी नगर पोलीस लाईनमधील राहत्या घरात आत्महत्या केली आणि पोलीस दलासह दौंड तालुक्यातही एकच खळबळ माजली.
नाना हंडाळ हे पोलीस नाईक या पदावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे सर्वचजण दुःखात बुडालेले असतानाच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहा खाली व्हिडीओ👇👇
या व्हिडिओमध्ये ते दिलखुलास नाचताना दिसत असून हि व्यक्ती आत्महत्या करू शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. नाना हंडाळ हे एक दिलखुलास आणि सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व होते.
त्यांनी आपण पोलीस आहोत हे कधी लोकांना जाणवू दिले नाही. कायम लोकांना मदत करत राहणे, त्यांना धीर देणे आणि दुःखातून बाहेर काढणे याची लकब त्यांच्यामध्ये होती.
त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असेल यावर त्यांच्या मित्र परिवाराचा विश्वास बसणे अवघड आहे.