खुटबाव येथे मटका अड्डयावर यवत पोलिसांचा छापा, तिघांवर गुन्हा दाखल

यवत : यवत पोलीसांनी मटका घेणाऱ्या इसमावर कारवाई करून ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकारनामा चे युट्यूब चॅनेल पुढील लिंकवर जाऊन सबस्क्राईब करा..  https://www.youtube.com/@Sahkarnama

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८/०३/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना खुटबाव, (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये इंदीरानगर येथे दोन इसम कल्याण मटका नामक जुगाराची साधने जवळ बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांकडुन पैसे घेवुन मुंबई मटका नावाचा जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सहा. फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेंद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांना सदर बाबत माहिती देवुन कारवाई करण्यास सांगितले होते.

वरील पोलीस स्टाफ ने खुटबाव च्या हद्दीत असणाऱ्या इंदीरानगर येथे जावुन अचानक छापा टाकला असता या ठिकाणी १) राजेंद्र यादव घोडके (वय ५० वर्षे, रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) २) राजकुमार दगडुलाल शर्मा (वय ६६वर्षे, रा.बोरीपार्धी, बेतल कॉलनी, ता. दौंड, जि.पुणे) मटका खेळवीत असणाऱ्या या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळुन आला. वरील आरोपिंनी मटक्याचे सर्व पैसे गोळा करून गोटु पवार (रा. यवत, ता. दौंड, जि.पुणे) याच्याकडे जमा करीत असलेबाबत सांगितले.

त्यामुळे वरील आरोपी आणि गोटु पवार (रा. यवत, ता. दौंड,जि.पुणे) या तिघांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीसनिरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांच्या पथकाने केली आहे.