यवत पोलीसांची ‛पारगाव’ येथील ‛जुगार’ अड्ड्यावर धाड! 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करत ‛आठ’ जुगाऱ्यांना पकडले

दौंड : पारगाव (ता.दौंड) येथे एका जुगार अड्ड्यावर यवत पोलीसांनी धाड टाकून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा जगार अड्डा पारगाव गावच्या हद्दीत बांधकाम चालु असलेल्या एका घराच्या आडोश्यास सुरू होता.

यवत पोलीसांनी १) बापु पोपटराव
सांळुखे, (वय ३९ वर्षे, रा.पारागव ता
दौड जि.पुणे) २) पप्पु नारायण पवार, (वय
३२ वर्षे,रा. देलवडी जि.पुणे) ३) विनोद साहेबराव (वय ३७ वर्षे, रा.नाव्हरा ता. शिरूर जि.पुणे) ४) किसन विठठल (वय ५० रा.मांढवगण फराटा ता शिरूर जि.पुणे) ५) राहुल बाबुराव मोरे (वय ३० वर्षे, रा. बाजारतळा शेजारी नाव्हरा ता. शिरूर जि. पुणे) ६) आझरूददीन आब्दुल कादिर शेख ( वय ३६, भेकराईनगर, हडपसर पुणे) ७) संतोष बारकू बिडगर (वय ४२, न्हावरा, शिरूर, पुणे) ८) रमण द्वारका अगरवाल ( वय – ४३, काळेपडळ, हडपसर पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

वरील आरोपी यांनी बेकायदा बिगरपरवाना दोन वेगवेगळे गटात तीन पत्ती जुगार खेळीत असताना पोलीसांनी छापा मारला होता यामध्ये वरील आठ आरोपी पोलिसांना मिळून आले. या आरोपींविरुद्ध तात्याराम करे (पोलीस नाईक, यवत पोलीस स्टेशन) यांनी आरोपींविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. अधिक तपास पोना जगताप करीत आहेत.