Sangli | जिल्ह्यातील वाढती ‛गुन्हेगारी’ चिंतेची बाब पोलिसांनी ‘एक्शन मोड’वर येणे आवश्यक – पालकमंत्री ना.सुरेश खाडे

सुधीर गोखले

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात खून, दरोडे, नशेखोरी चे प्रमाण वाढले असून सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. पोलीस प्रशासनाने आता एक्शन मोडमध्ये येऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. सुरेश खाडे यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची भेट घेऊन वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निवेदन दिले होते आज पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यलयामध्ये यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी आढावा घेतला आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या.

त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण होऊन नागरिक निर्भयपणे राहण्यासाठी त्वरित कठोर पावले उचलने गरजेचे बनले आहे. आजच्या बैठकीमध्ये भाजप अनु जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा मोहन वनखंडे, युवा नेते सुशांत खाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.