Categories: Previos News

Police murder in Pune – पुण्यात पोलीस हवालदाराचा सपासप वार करून खून! त्याच परिसरात एका महिलेचाही खून, एकाच दिवशी 2 खून झाल्याने प्रचंड खळबळ



| सहकारनामा |

पुणे : पुुण्यात एका पोलिस हवालदाराचा खून (police murder in pune) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोरोना काळातही पुणे शहर शांत राहण्याचे नाव घेईना असे एकंदरीत घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. 

पुणे शहरात एकाच दिवसात लागोपाठ दोन खून झाल्याने प्रचंड खळबळ माजली असून या खून (police murder in pune)

झालेल्यांमध्ये एका पोलीस हवालदाराचाही समावेश असल्याने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार पुण्यातून तडीपार असलेल्या प्रवीण महाजन या गुंडाने बुधवार पेठेत समीर सय्यद या पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

तर पोलीस यंत्रणा या खुनाची माहिती घेत असतानाच त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचाही खून झाला असल्याचे समोर आले आहे या एकाच परिसरात दोन खून झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. या महिलेचा कुणी आणि का खून केला याबाबत तपास सुरू आहे.

पहिला खून हा ड्युटीवरून घरी जात असताना 48 वर्षीय समीर सय्यद या पोलीस हवालदाराचा बुधवार पेठे परिसरात झाला असून दुसरा खून हा 24 वर्षीय राणी नावाच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा त्याच परिसरात झाला आहे.

पुण्यात झालेल्या या दुहेरी खूनाचा अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago