police in action mode – शहरात आणि तालुक्यात मोकाट फिरणाऱ्यांची वाहने ‛जप्त’ केली जाणार : पोलीस निरीक्षक पवार



| सहकारनामा |

दौंड : दौंड शहर आणि तालुक्यात मोकाट फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांकडून थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असून तसे आदेश आणि अधिकार आता पोलिसांना देण्यात आले आहेत.

कोरोना ग्रस्तांची वाढती रुग्ण संख्या कमी होत आहे परंतु दौंडकर नागरिकांनी प्रशासनाला आणखीन थोडी मदत केली तसेच संचार बंदीचे नियम पाळले तर लवकरच आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंडकरांना आवाहन केले आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, संचार बंदी च्या काळात ज्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांना दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे त्यांनी प्रशासनाने दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे, दुकानांमध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच शनिवार व रविवार प्रत्येकाने कडक लॉक डाऊन पाळावा. शहरात विनाकारण मोकाट फिरणार्‍यांवर पोलीस कारवाई करणार असून त्यांची वाहने जप्त करून त्यांच्या कडून दंडही वसूल केला जाणार आहे असेही नारायण पवार म्हणाले. 

शहरातील गोल राऊंड चौक, नगर मोरी चौक, आंबेडकर चौक,शिवाजी चौक, कुरकुंभ मोरी, रेल्वे उड्डाण पूल या ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार असून प्रत्येक वाहन चालकाची चौकशी केली जाणार आहे. कारवाई टाळण्यासाठी दौंड करांनी पोलीस   प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन दौंड पोलिसांकडून करण्यात आले आहे.