Categories: Previos News

Police caught the gamblers- 3 पत्ती जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांची धाड, जुगार अड्डा मालकासहित 8 जणांवर गुन्हा दाखल

| सहकारनामा |

दौंड : शहरातील गोवा गल्ली येथे सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकीत जुगार अड्डा मालका सहित आठ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, साथीचे रोग अधिनियम, महाराष्ट्र कोविड-19 अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधि नियमान्वये गुन्हे दाखल केले असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. 

संजय शामिल गायकवाड (गोवा गल्ली), अजय सुनील वरपे (नेहरू चौक), असलम रहीम सय्यद, विठ्ठल सुदाम गायकवाड (दोघे रा. वडार गल्ली), दिगंबर लक्ष्मण वाघमोडे (सोनवडी), सिद्धार्थ गोविंद भडकुंबे( पानसरे वस्ती), दादा जाधव( गोपाळवाडी), मोशिन शेख( गांधी चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शहरातील गोवा गल्ली परिसरामध्ये एका बंद पत्र्याच्या खोलीमध्ये तीन पत्ते नावाचा जुगार अड्डा  सुरू असल्याची माहिती  दौंड पोलिसांना मिळाली असता पो.उप अधीक्षक मयूर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दौंड पोलिसांच्या पथकाने दि. 7 मे रोजी या ठिकाणी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले, या ठिकाणाहून जुगाराची साधने व 26 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती  दौंड पोलिसांनी दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago