दौंड : स्पीकर साऊंड सिस्टम चे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशाचे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे.
पोनि. नारायण पवार यांनी पुढे बोलताना रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही कारणासाठी स्पीकर वाजवता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी पाहटेची नमाज तसेच हिंदू साठी भजन, कीर्तन, काकड आरती, जागरण गोंधळ तसेच सामाजिक कारणासाठी यात्रा, तमाशा, आर्केस्ट्रा, लग्न, वरात अशा कोणत्याही कारणासाठी रात्री 10:00 ते सकाळी 6:00 या वेळेत स्पीकर वाजवता येणार नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
त्यामुळे जर रात्री दहानंतर कोणी स्पीकर वाजवत असेल तर पोलिसांना त्वरित फोन करून बोलावून घ्यावे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येईल कुणाची हयगय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
आणि दिवसा 06:00 ते 10:00 या वेळेत कोणत्याही कारणासाठी स्पीकर वाजवायचा असेल तर परवानगी घ्यावी लागेल आणि दिलेल्या परवानगीतील अटी शर्तीनुसार आवाजाची मर्यादा ठेवावी लागेल, डीजेचा आवाज नियमावलीतील दिलेल्या डेसिबलच्या मर्यादांचे उल्लंघन करतोच म्हणून कोठेही डीजे वाजला तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल म्हणून कोणीही डीजे सारख्या साऊंड सिस्टिमसाठी वापर करू नये साध्या साउंडचा वापर करावा. असे आवाहन करताना डीजे कोठे वाजला तर गुन्हा दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.