बारामती दौंडमध्ये वाटमारी करणाऱ्या सागर उर्फ सोन्या सूर्यवंशी ला मोक्का

पुणे : बारामती, दौंड तालुक्यात वाटमारी, चोऱ्या करणाऱ्या सागर उर्फ सोन्या जालिंदर सुर्यवंशी या टोळीप्रमुखावर यवत पोलिसांनी मोक्का कायदयांतर्गत कार्यवाही केली आहे. यवत पोलीस स्टेशन गु.रजि.नं ९९२/२०२१ भा.द.वि.क ३९४,३४ प्रमाणे दिनांक १४/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयामधील फिर्यादी हे त्यांचे मोटार सायकल वरून कारखेल (ता.बारामती) येथुन येत असताना दोन अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीस जगताप वस्तीकडे जाणारे रस्त्यावर आडवुन सुपा रोड कुठला आहे असे विचारून फिर्यादीचे गळयावर, हातावर चाकुने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी करून फिर्यादीचा मोबाईल फोन व गळयातील सोन्याची चैन तसेच हातातील दोन अंगठया असा ६८,000/-रू किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने चोरून नेला होता.
अशी फिर्याद दिलेली होती. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक सो बारामती व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो दौड विभाग दौंड यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार व त्यांचे पोलीस
पथकातील , तपासीक अंमलदार पो.स.ई संजय नागरगोजे, तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हवा.निलेश कदम, पो.हवा.गुरूनाथ गायकवाड,पोलीस नाईक महेंद्र चांदणे,पो.ना.रामदास जगताप यांचे पथकाने
कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयामध्ये प्रथम सोन्या उर्फ सागर जालिंदर सुर्यवंशी वय २८ वर्षे रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने सदरचा गुन्हा हा
त्याचा साथीदार २) काका उर्फ मारूती नाना वायाळ वय ३१ वर्षे रा.बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे यांचे साथीने केला असल्याचे निष्पन्न झालेले होते. गुन्हयाचा तपास करीत असताना सदर गुन्हयामधील आरोपी नामे सोन्या उर्फ सागर जालिंदर सुर्यवंशी याने त्याचे टोळीतील सदस्य यांना बरोबर घेवुन संघटीतपणे स्वत:चे तसेच टोळीतील सदस्य यांचे आर्थिक प्राप्ती तसेच टोळीचे वर्चस्वाकरीता एकुण ५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(४) हे कलम लावणेबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक यवत यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक साो बारामती यांचे मार्फतीने मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांना पाठविलेला होता. मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदरचा प्रस्ताव हा मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांना केल्यानंतर मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिलेली असुन सदर आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलमान्वये कार्यवाही करण्यात आलेली असुन गुन्हयाचा तपास मा. श्री. गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती हे करीत आहेत. सदरची
कार्यवाही हि मा. श्री.अभिनव देशमुख साो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलिंद मोहीते अपर पोलीस अधीक्षक बारामती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार,सहा.पो.निरी.
केशव वाबळे, पो.उप.निरी श्री. संजय नागरगोजे, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा.गुरूनाथ गायकवाड,पोलीस नाईक अजित काळे ब.नं २३३३, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड ब.नं.२०४५ यांनी
केलेली आहे.