|सहकारनामा|
गडचिरोली – गडचिरोलीमध्ये (gadchiroli) पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस (maharashtra police) आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली असून या चकमकीमध्ये जवळपास 13 नक्षवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा नक्षलवाद्यांचा कुरापतींचा गड समजला जातो. याच जिल्ह्यात C 60 या महाराष्ट्र पोलिसांच्या टीमने येथे कारवाई करत जवळपास 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. खात्मा करण्यात आलेल्या 13 जनांपैकी 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
Maharashtra: Bodies of at least six Naxals recovered in the forest area of Etapalli, Gadchiroli in an ongoing encounter between the C-60 unit of Maharashtra Police and Naxals. More details awaited.
— ANI (@ANI) May 21, 2021
Ani या वृत्तसंस्थेकडून याबाबत अधिकृत वृत्त दिले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हि चकमक एटापल्ली तालुक्यातील कोटमी या गावाच्या जवळ असणाऱ्या जंगलात घडली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने अगोदर शोधमोहीम राबवली होती.
या ठिकाणी पोलीस आपले कार्य करत असताना तेथे लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची जोरदार चकमक उडाली आणि जवळपास 13 नक्षवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले.