Categories: Previos News

PMAY – उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प योजनेची पाहणी



 पुणे : सहकारनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे PMAY प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह प्रकल्प योजनेच्या कामांची आज पाहणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह प्रकल्पाचे काम लवकरात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचबरोबर भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ, सदनिकेचे चटई क्षेत्र, एकूण सदनिका, गृहप्रकल्पातील एकूण व्यापारी गाळे, प्रकल्प उभारणीकरीता लागणारा खर्च, सदनिकेची विक्री किमंत तसेच रंगरंगोटी, क्रीडांगण, पार्किंग, उद्वाहिका, सोलर पॅनलची व्यवस्था, पाण्याचे नियोजन, ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, क्लब हाऊस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छतागृह, फर्निचर, अग्निशामक यंत्रणा, अग्निप्रतिबंधक दरवाजा, मैला सांडपाण्याचे वाहिन्या, वाहतूक आदि पायाभूत सोई सुविधांची माहिती जाणून घेतली. PMAY गृह प्रकल्पाची माहिती क्रिएशन्स् इंजिनिअर्स प्रा. लि.चे  रमाकांत भुतडा यांनी दिली.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माजी महापौर मंगला कदम, संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago