पुणे : निवडणुका जवळ आल्या की नेते मंडळींकडून एक दुसऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरु होतात. मात्र ते आरोप-प्रत्यारोप करताना त्याचा बारकाईने अभ्यास करनेही गरजेचे असते अन्यथा एखाद्या योजनेवर उपस्थित केलेले प्रश्न आणि आरोप हे अंगलटहि येतात.
दौंड तालुक्यातही अश्याच एका योजनेवरून मोठे आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. आणि हि योजना अमलात येऊ शकत नाही, निवडणुकीच्या तोंडावर असल्या फसव्या योजनांचे प्रलोभन दाखवून लोकांना गंडवले जात असल्याची टीका आमदार राहुल कुल यांच्यावर करण्यात आली होती.
आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन करताना, सर्वांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरावेत, लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अडीच लाख रुपये मिळणार आहेत अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषनेला आणि आवाहनाला अनेकांनी हे फक्त निवडणुकीपुरते दाखविलेले ‘गाजर’ आहे अशी टीका केली होती. मात्र आमदार राहुल कुल यांनी कृतीतूनच आपण दिलेला शब्द हा खरा होता आणि आपण ज्या योजनांची घोषणा करतो ती अभ्यासपूर्वक असते हे दाखवून दिले आहे.
आमदार राहुल कुल यांनी सांगितल्या प्रमाणे आणि त्यांच्या पाठपुराव्याने अखेर प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिल्या 10 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा झाले आहेत. जस जसे लाभार्थिंच्या घरांच्या कामांचा टप्पा पुढे सरकत राहील तसा पुढील निधीही टॅगिंग केल्यानंतर खात्यावर जमा होणार आहे.
आमदार राहुल कुल यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याचा पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला यश येऊन आता प्रधानमंत्री आवास योजनेची कामे दौंडमध्ये सुरु झाली आहेत.