|सहकारनामा|
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने मोठा हैदोस घातला आहे. कोरोना आटोक्यात येताना दिसत असला तरी दररोज हजारो कोरोना बाधितांचा मृत्यू होत असल्याने प्रशासन, डॉक्टर्स आणि नागरिकही या जुलमी व्हायरसपुढे मानसिकरित्या हतबल होऊन
त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आल्याचे पाहायला मिळते मात्र आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपले हे अश्रू रोखता आले नाहीत.
घडले असे की देशात कोरोनाचा उद्रेक आणि त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजना याबाबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे पॅरामेडिकल स्टाफ, फ्रंटलाईन वर्कर आणि डॉक्टर यासोबत संवाद साधला. मात्र या मीटिंगमध्ये ज्यावेळी कोरोना रुग्णांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली त्यावेळी मोदींना गहिवरून आले आणि त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्वतःला सावरत कोरोना व्हायरसने आपल्या जवळील अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतले असून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो असे म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली.