Categories: सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 600 झाडांचे वृक्षारोपण.. भारतीय जैन संघटना, एक मित्र-एक वृक्ष संघटनेचा स्तुत्य उपक्रम

दौंड | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जैन संघटना यांनी वृक्षारोपनाची मोहीम देशभर हाती घेतली आहे. केडगाव विभागाच्या वतीने व एक मित्र एक वृक्ष संस्था केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 600 झाडांचे वृक्षारोपण केडगाव येथे करण्यात आले.

या उपक्रमा वेळी भारतीय जैन संघटनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदुभाऊ साखला, राज्य सचिव दिपकभाऊ चोपडा, विभागीय अध्यक्ष सचिन बोगावत, विभागीय सचिव विरेश छाजेड, उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, विभागीय सदस्य कमलेश गांधी, मनोज गुंदेचा , पुणे ग्रामीण 1 चे जिल्हाध्यक्ष मनोज पोखरणा, खजिनदार प्रितम गांधी, केडगाव सरपंच अजित शेलार, केडगाव श्रावक संघ चे अध्यक्ष निशांत चोपडा, उपाध्यक्ष संतोष शेलोत , खजिनदार चेतन मांडोत, सचिव श्री गौरव गुंदेचा, एक मित्र एक वृक्ष चे अध्यक्ष प्रशांत मुथा, संजय मेहेर, महावीर पारख हे उपस्थित होते.

या मध्ये जास्तीत जास्त देशी झाडे लावण्यात आली ज्यामध्ये करंज, शिसम, पिंपळ, चिंच या वृक्षाचा वापर करण्यात आला. सदर रोपे इंदापूर येथील शहा नर्सरीने दिली होती. जगामध्ये वृक्षांची वारेमाप वृक्षतोड होत असल्याने संपूर्ण जगात तापमान वाढ होताना दिसत आहे. या तापमान वाढीचा मोठा फटका विविध देशांना जाणवू लागला असून यात भारतालाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तापमान वाढ रोखायची असेल आणि भरपूर पाऊस हवा असेल तर वृक्ष लागवडी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे भारतीय जैन संघटना तसेच एक मित्र, एक वृक्ष या संघटनांकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago