दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे भर लग्न मंडपात पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर आमच्या विरोधात बातम्या केल्या म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. यातील पाच आरोपींवर यवत पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तसेच विविध कलमान्वये आता गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपींचे सोशल मिडियावरील फोटो पाहून अनेकजण चक्रावले आहेत.
पत्रकार विनोद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड (सर्व रा. कुसेगाव ता. दौंड) यांच्यावर भादवि कलम महाराष्ट्र प्रसार. मा. व्यक्ती आणि मा. संस्था अधिनियम 2017 चे कलम 4 तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 30/04/2023 रोजी दुपारी 01:30 च्या सुमारास पाटस (ता. दौंड) येथे पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये पत्रकार विनोद गायकवाड हे सतीश मधुकर गायकवाड यांच्या मुलीचा लग्न समारंभ उरकून जेवायला जात असताना आरोपी साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड यांनी दोन वर्षापुर्वीच्या कुसेगाव (ता.दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या वादाची बातमी केल्याचा राग मनामध्ये धरून त्यांना शिवीगाळ करत आज तुला सोडतच नाहि, तु दोन वर्षापासून खोटया नाटया बातम्या देतोस, आज तुझी पत्रकारीताच काढतो असे म्हणुन हाताने लाथाबुक्याने मारहाण करत शुभम गायकवाड याने त्याचे हातातील कसल्यातरी धारधार हत्याराने त्यांच्या डोक्यात मारून पत्रकार गायकवाड यांना जखमी करून जिवघेना हल्ला केला होता.
यातील आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपींचे सोशल मिडियावरील स्टेट्स, फोटो पाहून या हल्ल्यातील आरोपींची गुंड प्रवृत्तीची मानसिकता प्रखरपणे समोर येत आहे.