|सहकारनामा|
दौंड : फोन पे (phonepay) ऑपरेट करताना एका ऑपरेटरकडून केडगाव येथील महिलेची सुमारे 96 हजार 876 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची गंभीर घटना केडगाव ता.दौंड येथे घडली आहे. याबाबत सदर महिलेने फिर्याद दिल्यानंतर संबंधित अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूनम हस्तीमल पितळे (वय 37, रा.केडगाव स्टेशन ता.दौंड जि.पुणे) असे फसवणूक झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दिनांक १६/०६/२०२१ रोजी त्या त्यांच्या केडगाव स्टेशन येथील घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवरून फोन पे Phonepay या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस चा वापर करीत असताना या सर्व्हिस चे ग्राहकसेवा देणारे ऑपरेटर यांनी त्यांचा विश्वास संपादन करून दुपारी ०३:१६ वा ते ०३:३१ वाजे पर्यंत त्यांच्या बँक ऑफ इंडीया शाखा केडगाव ता.दौड जि.पुणे येथील खात्यामधून ९६ हजार ८७३ रुपये पिन नंबरचा वापर करून काढुन घेत त्यांची फसवणुक केलेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात
मोबाईल नंबर धारक आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.