सुधीर गोखले
सांगली : मिरज लोंढा रेल्वे मार्गावरील उगार खुर्द ते विजयनगर रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरण कामासाठी मिरज रेल्वे स्थानकांमधून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या ७ जून पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
तिरुपती -कोल्हापूर व कोल्हापूर -तिरुपती एक्सप्रेस दि २९ ते ६ जून दरम्यान कोल्हापूर ऐवजी आता बेळगाव पर्यंत धावेल तसेच ती बेळगाव पासून तिरुपती कडे रवाना होईल हि गाडी कोल्हापूर ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे राणी चन्नमा एक्सप्रेस, निजामुद्दीन-यशवंतपूर, पंढरपूर-यशवंतपुर आणि पुणे एर्नाकुलम या चार गाड्या उशिरा धावणार आहेत मिरज-बंगळूर राणी चन्नमा एक्सप्रेस दि २९ मे ते ६ जून पर्यंत तब्बल ३० मिनिटे ते २ तास इतक्या उशिराने धावतील शुक्रवारी दि २ जून रोजी यशवंतपूर-पंढरपूर आणि हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्सप्रेस एक तास उशिरा धावणार आहे सोमवारी दि ५ जून रोजी एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस ४० मिनिटे उशिरा धावेल.
ऐन उन्हाळी सुट्टी मध्ये रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाचे काम सुरु केल्याने पश्चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक तिरुपती देवस्थान ला जात येत असतात त्यांचे मात्र हाल होत आहेत