पारगाव ग्रामपंचायत निवडणूक विशेष | खाजगीत ‘मदत’ आणि लोकांमध्ये ‘विरोध’, हिरो बनून ‘व्हीलन’ ची भूमिका निभावणारे तोंडघशी पडणार

ग्रामपंचायत निवडणूक विशेष

दौंड : दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजल्यानंतर आता विविध ठिकाणी नवे जुने हिशोब चुकते करण्यासाठी जनता सरसावली आहे. असाच काहीसा प्रकार पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पहायला मिळणार असल्याचे लोकांच्या चर्चेतून पुढे येत आहे. पारगाव या ठिकाणी सदस्यांऐवजी सरपंच पद मिळविण्यासाठी अनेकांनी कंबर कसली असून येथील सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुष (ओपन पुरुष) या जागेसाठी आरक्षित आहे. मात्र हे सर्व होत असताना काही महत्वाच्या गोष्टीही समोर येताना दिसत आहेत. त्याचा फटका कुणाला बसणार हे येत्या 6 नोव्हेंबर रोजी समजणार आहे.

विशेष घडामोडीत ‘हिरो’ बनून आणि ‘व्हिलन’ ची भूमिका कुणी बजावली..! काही काळापूर्वी एका महत्वाच्या विषयात आतून पाठिंबा आणि वरून विरोध अशी काहीशी घडामोड घडली होती. या घडामोडीमध्ये काहींनी विशिष्ट लोकांची दोन-तीन ठिकाणी बैठक घेत तुमचे बरोबर आहे पण आमची ना…. आहेत त्यांना काही कळत नाही, त्यामुळे मी म्हणतो तसे करा, तुम्हाला काही अडचण येणार नाही असे म्हणत आपल्याच लोकांना शिव्यांची लाखोली वाहून पुढच्यांचा विश्वास संपादन करण्याची मोठी कुटील पद्धत अवलंबली होती. यात जिकडे गूळ खोबरे तिकडे उदो उदो चा प्रत्यय यावेळी बैठकीतील लोकांना नंतर आला होता. अंगलट बाजू आली की हिरो बनून व्हीलन ची भूमिका बाजवायची असा काहीसा प्रकार त्यांच्या आणि इतरांसोबत घडला होता. मात्र आतून मदत करणारे हेच आणि लोकांमध्ये सर्वात पुढे ही असणारे हेच हे बहुतेक आता सर्वांना समजून चुकले. त्यामुळे हे पितळ ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघडे करण्यासाठी काहीजण सरसावले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकी वेळी राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे त्या कुटील बैठकिंचे बोललेले रेकॉर्ड पुरावे काहींनी ठेवले असल्याने याचा निवडणुकीच्या तोंडावर धमाका होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त काहींच्या चर्चेतून पुढे येत आहे. त्यामुळे कुटील डाव टाकणाऱ्यांवरच चितपट होण्याची वेळ येते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे.. कुटील राजकारणाचे बळी पडलेल्यांना ‘खायचे दात वेगळे’ आणि ‘दाखवायचे दात वेगळे’ असतात या म्हणीचा प्रत्यय चांगलाच आला आहे. त्यामुळे त्यांचेच दात त्यांच्याच घशात घालण्याचे कार्य बळी पडलेल्यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे. ‘चित भी मेरी’ और ‘पट भी मेरी’ असा कायमच आखाडा रंगावणाऱ्यांना मात्र हा डाव भलताच महागात पडणार असे दिसत आहे. कुठे बोलावे, काय बोलावे, कुणाबद्दल बोलावे याचे भान नसणाऱ्यांच्या अंगलट हा डाव येणार हे मात्र नक्की आहे.

अशी होणार लढत, मुस्लिम उमेदवार ही उतरणार रींगणात…

पारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मच्छिन्द्र ताकवणे, सयाजी ताकवणे, सुभाष बोत्रे, सर्जेराव जेधे, माऊली ताकवणे, तुकाराम ताकवणे, संभाजी ताकवणे तसेच मुस्लिम समाजातील एक अशी इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. यात अजूनही काही नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांचा फटका नेमका कुणाला बसणार हे निकाल लागल्यानंतर समजणार आहे.