पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, परळी वैजनाथ येथील सहकारी साखर कारखान्याचा होणार लिलाव

बीड : माजी आमदार भाजप नेत्या पंकजा मुंडे या चेअरमन असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याचे आता समोर आले आहे. हा कारखाना संबंधित बँकेकडून विक्रीला काढण्यात आला असून या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये इतके थकीत कर्ज आहे. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून 203 कोटी 69 लाख रुपयांचे थकीत कर्ज, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून लिलावाची ही प्रक्रिया हाती घेतली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लिलावाच्या नोटीसमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे, व्यंकटराव कराड, यशश्री मुंडे यांच्या नावे नोटीसमध्ये कर्जदार, जामीनदार व तारणदार म्हणून नमूद आहे.

परळी वैद्यनाथ हा सहकारी साखर कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या योगदानातून उभा राहिला होता. बीड जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी त्यांनी या कारखान्याची उभारणी केली होती. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर झालेले बँकांचे कर्ज आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे 203 कोटी 69 लाख रुपये थकीत कर्ज यामुळे हा कारखाना अडचणीत आला आहे. त्यातच आता बँकेने कारखान्याच्या लिलावाची नोटीस काढली असल्याने त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago