दौंड : कोरोना महामारी चे संकट शहरावरून अद्याप पूर्णपणे टळले नसल्याने दौंड शहरातील मुस्लिम बांधवांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यंदाची पैगंबर जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी केली. मुस्लिम बांधवांच्या भूमिकेचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले. जयंती निमित्ताने शहरातून निघणारी मिरवणूक, फटाक्यांची अतिषबाजी या सर्व गोष्टी टाळून येथील ऐतिहासिक शाही आलमगीर मशिदीमध्ये जयंती साजरी करण्यात आली. अलमगीर मशिद ट्रस्ट व मुस्लिम बांधवांच्या वतीने जयंती निमित्ताने अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मशिदीचे मौलाना शमसुद्दीन शेख, विश्वस्त युसुफ इनामदार, अकबर इनामदार आदि उपस्थित होते. कुमेल कुरेशी, शाकीर बागवान, इम्रान नालबंद, मुनीर शेख, मुजाहिद खान, अमजद शेख, फिरोज पटेल व सहकाऱ्यांनी अन्नदान उपक्रमाचे आयोजन केले.
जयंतीच्या निमित्ताने दौंड शहर एम. आय. एम. पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कुमेल कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे, नगरसेवक बबलू कांबळे, सोहेल खान, शैलेंद्र पवार, अश्विन वाघमारे, गणेश दळवी, मोहसीन बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, 52 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. रक्तमित्रांना आयोजकांच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी उपयोगी असणारे वाफेचे मशीन भेट देण्यात आले. रोटरी ब्लड बँक, दौंड यांचे सहकार्य लाभले. पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख, हमीद शेख, अमीर शेख, मुजम्मिल शेख, इरफान डफेदार, मयूर परदेशी यांनी शिबिराचे आयोजन केले.
शहराच्या परंपरेप्रमाणे येथील सर्वच समाज, पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत पैगंबर जयंती साजरी केल्याने शहरात जातीय सलोखा अबाधित असल्याचे चित्र दिसून आले. कोरोना पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती प्रशासनाने दिलेल्या सुचने नुसार साध्या पद्धतीने साजरी केल्याने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मुस्लिम समाजाचे कौतुक करीत आभार मानले.
Home Previos News पैगंबर जयंती निमित्ताने दौंडमध्ये रक्तदान,अन्नदान उपक्रमांचे आयोजन, ‛या’ कारणासाठी पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम...