दौंड : दौंड मधील सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील SRJ फाउंडेशनच्या वतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार, अनिल सोनवणे, बबलू कांबळे, शहानवाज पठाण, राजेश पाटील, संतोष जगताप, नामदेव राहींज, गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास दौंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये 130 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना यावेळी हेल्मेट भेट देण्यात आले. तसेच 350 जणांची डोळे तपासणी करण्यात आली, त्यापैकी 27 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 150 जणांनी शरीरातील चरबीचे प्रमाण तपासणी करून घेतली.
पाच वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड शिबिरामध्ये बनवून देण्यात आले. पोस्टाच्या विशेष विमा योजनेअंतर्गत 399 रु मध्ये 10 लाख रु. ची विमा पॉलिसी उतरविण्यात आली. किरण खडके, राकेश भोसले, रोहन घोरपडे, अमोल जगदाळे, सिद्धेश कदम, अविनाश ढमढेरे, सोनू बलाडे ,विठ्ठल फुटाणे, किरण पलंगे ,प्रथमेश कदम, उमेश घोलप, प्रथमेश उतरंडे, ऋषिकेश पलंगे, आनंद जाधव यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.