दौंड : निवडणूका आल्या की विरोधकांना कारखाना आठवतो. ज्यावेळी कारखाना अडचणीत होता त्यावेळी विरोधक त्याचा लिलाव करून विकण्याच्या तयारीत होते तर शेतकरी आणि सभासदांचा असलेला हा सहकारी कारखाना कायम त्यांच्याच मालकीचा रहावा आणि त्यांची दुसरीकडे पिळवणूक होऊ नये म्हणून आम्ही तो वाचविण्यासाठी प्रयत्न करत राहिलो.
त्या प्रयत्नांना मोठे यश येऊन कारखाना सुरु झाला आणि तो ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांच्या मालकीचा राहिला याचं मोठं दुःख विरोधकांना झालं आहे. कारखान्याबाबत जर विरोधकांना इतकं प्रेम होतं तर त्यांनी कारखान्याच्या निवडणुका का लढले नाहित. फक्त फॉर्म भरायचा आणि माघारी घ्यायचा इतकेच काम त्यांनी केले अशी टिका दौंडचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन राहूल कुल यांनी पत्रकार परिषदेत केली.
सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या प्रचारामध्ये विरोधकांकडून कारखान्याला लक्ष केले जात आहे. मागील निवडणुकीवेळी सुद्धा कारखान्याला लक्ष करण्यात आले होते मात्र त्यावेळी तो बंद होता तर आता मात्र कारखाना सुरु असल्याने विरोधकांना आरोप करण्यासारखे काही शिल्लक राहिल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणाररा भीमा पाटस कारखाना सुरु झाला याचं विरोधकांना मोठं दुःख आहे. विरोधकांकडे विकासाचं कोणतही व्हिजन नाही. त्यामुळे ते फक्त टिका, टिप्पनी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र या तालुक्यातील सुज्ञ जनतेला सर्व माहित आहे.
कोण फक्त राजकारण करतं आणि कोण काम करतं हे आता जनतेने ओळखून घेतलं आहे आणि उद्याच्या निवडणुकीत ते मागीलपेक्षा मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून देतील अशी खात्री असल्याचे आमदार राहुल कुल म्हणाले. विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टिका केली तरी आम्ही मात्र फक्त तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावरच बोलत राहणार आणि त्यावरच ठाम राहणार असल्याचेही शेवटी आ.कुल म्हणाले.