शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी एप्रिल महिन्यातील ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

पुणे : लाल कांद्याची कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचा असून अर्जासोबत कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, शेतकऱ्याचे बँक खातेपुस्तकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत ( आयएफएससी कोड व खाते क्रमांक तपशीलासह) जोडावयाची आहेत.

कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, शेतकरी, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड खरेदी केंद्र येथे सर्व शेतकऱ्यांना निःशुल्क उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यास साध्या कागदावर देखील विहीत माहिती नमूद करुन कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल, असे सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) चे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी कळविले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago