तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

दौंड : सध्या राज्यात तुतारी ची मोठी हवा आहे. त्यामुळे सध्या वातावरण पाहून ज्याला त्याला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर लढायचे आहे. त्यामुळे अनेकजण जेष्ठ नेते शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज करत आहेत. यात दौंड तालुकाही मागे नसून दौंड तालुक्यातूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र ही संख्या वाढत असताना माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांनीही रमेश थोरात यांनी तुतारी चिन्हावर लढावे अशी जोरदार मागणी केली आहे.

मात्र ज्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी दौंड तालुक्यातील अनेकजण धडपड करत आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी वरवंड येथील लोकसभा निवडणूक प्रचार सभा, पत्रकार परिषदेमध्ये कुल कुटुंबियांची तोंडभरून स्तुती केली होती. कुल कुटुंब हे संस्कारी, आदर्शवादी कुटुंब आहे, आमदार राहुल कुल हे त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत असून त्यांनी तालुक्यात संस्कार जपले, मोठी कामे केल्याची पावती यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिली होती. तर कुल कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे. दिवंगत आमदार सुभाष आण्णा कुल, माजी आमदार रंजनाताई कुल आणि आता आमदार राहुल कुल, कांचन कुल हे आदर्श आणि संस्कारी कुटुंब आहे. त्यांनी निवडणुकीत कधीही संस्कार सोडले नाहीत, कधीही टिका, टिप्पणी केली नाही याची पावती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्याने दौंड तालुक्यात नेमकं कोणतं चिन्ह घेऊन उभं रहावं असा प्रश्न अनेक इच्छुक उमेदवारांना पडला आहे.

कारण ज्यावेळी विरोधक असतानाही कुल कुटुंबियांचा आदर्श भर सभेत सांगितला जातो आणि त्या कुटुंबियांच्या कामाची, संस्काराची पावती दिली जाते त्यावेळी त्यांना फ्लेक्स लावून बदनाम करण्याचा किंवा सोशल मिडियावर त्यांच्या विरोधात नकारात्मक लिखाण केल्याचा असा किती परिणाम होणार हा विचार करून काहींना झोप लागणे मुश्किल झाले आहे. सध्या आमदार राहुल कुल यांच्या विषयी सोशल मिडीयावर नकारात्मक प्रचार करण्यात काहीजण अग्रेसर असल्याचे दिसत आहेत मात्र जनतेच्या तराजू मध्ये मोजमाप करताना या खालच्या टिकेने कुल यांचे पारडे अजून जड होताना दिसत आहे.

याचे प्रमुख कारण हे त्यांचे आरोग्य विषयक कार्य आणि तालुका, जिल्ह्यातील स्वप्नवत वाटणरी मात्र प्रत्यक्षात उतरलेली काम असल्याचे तालुक्यातील जनतेतून बोलले जात आहे. त्यामुळे जेथे विरोधक त्यांच्या कामाची पावती खुल्या सूर्य प्रकाशात देतात तेथे अश्या सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या उदबत्त्या त्यांना काय मलीन करणार असा सुर  ज्यांनी कुलांचे कार्य पाहिले अश्या जनतेकडून निघत आहे.