दौंड : दौंड तालुक्यातील खडकी येथे 8 लाख 36 हजार रुपयांची अफू जप्त करण्यात आली आहे. आरोपी 1) पांडुरंग सखाराम आरेकर (रा. शितोळेवस्ती नंबर 2, खडकी ता. दौंड जि. पुणे) 2) जिवनलाल दिपलाल शर्मा (रा. खडकी शिवार ता. दौंड जि. पुणे) 3) सूरेश गणपतीलाल शर्मा सध्या (रा. गुणवरेवस्ती, खडकी ता. दौंड जि.पुणे, मुळ रा. आशिन, सरकारी हॉस्पिटल शेजारी जि. भिलवाडा राज्य राजस्थान) यांनी संगणमताने खडकी (ता. दौंड जि. पुणे) गट क्र. 1116 मधील शेतात अफुची बेकायदेशिर लागवड केली होती.
या मधील अफु च्या झाडांचे एकुन वजन हे 418 किलो ग्रॅम असून त्यांचे प्रति किलो 2000/- रूपये दराने एकुन किंमत 8,36,000/- इतकी होत आहे. आरोपिंनी या झाडांची लागवड बेकायदेशीर अफू विक्री करण्याच्या उद्देशाने केली होती. या सर्व आरोपिंवर एन.डी.पी.एस कायदा कलम 1985 कलम 8 (B), 8 (C), 15, 17 (C), 18,32,46, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपिंविरुद्ध गोरख एकनाथ मलगुंडे, (पोलीस हवालदार बक्कल नंबर/296 नेमणूक दौंड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सपोनि गटकूळ हे करीत आहेत.