ऑनलाइन ‛क्रिप्टो करन्सी’ चा खेळ आला अंगलट! पुण्यात आयटी इंजिनिअर ची 46 लाख 14 हजारांची ‛ऑनलाइन’ फसवणूक, सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे येथील एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरची सुमारे ४६ लाख १४ हजार ११४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी हेमंत सुरेश परुळेकर ( वय ४६, रा.सरगम नांदेड सिटी, ता.हवेली जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत परुळेकर यांना सर्वप्रथम ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या टोळीने क्रिप्टो करन्सीच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना ६०हजार गुंतवणूक केल्यानंतर त्यावर १० हजार रुपये फायदा दाखवला त्यामुळे परुळेकर यांचा त्यावर विश्वास बसला. यानंतर त्यांनी ४९७४ नेकज म्हणजे भारतीय ३ लाख ९७ हजार ९२० रुपये गुंतवणुक केल्यानंतर फायदा झालेली रक्कम रुपये १० लाख १२ हजार ६७३ रुपये गुंतविण्यात आली व त्यातुन फायदा झालेली रक्कम १ कोटी २३ लाख रुपये इतकी दाखविण्यात आली होती. ती रक्कम काढुन घेण्यासाठी परुळेकर यांना बीटीसी फोर्चून व्हीआयपी १८०७ या व्हाट्सअप ग्रुपवरील असिस्टंट शर्ली व क्रूझ मार्क यांनी ३० टक्के कमीशन म्हणजे ४५,००० नेकज (भारतीय ३६ लाख रुपये) भरण्यास सांगितले होते. परंतु फिर्यादी यांच्याकडे एवढी रक्कम शिल्लक नसल्याने त्यांनी अक्षरशः लोण काढून ४१०४५ नेकज म्हणजे भारतीय रक्कम ३२ लाख ८३ हजार ६०० रूपये ही त्यांच्या बँक खात्यातुन मोबाईल अॅप्लीकेशनचा वापर करून त्यांच्या वेबसाईटवरील अंकाउटवर वर्ग केले होते. अशा प्रकारे फिर्यादी यांच्याकडून एकुण ४६ लाख १४ हजार १९३ रूपये भरून घेवुन फिर्यादी यांच्या अंकाउटवर असलेली कोणतीही गुंतवणुक केलेली रक्कम व त्यावर झालेल्या फायद्याची रक्कम त्यांना परत केली गेली नाही. याबाबत फिर्यादी यांनी असिस्टंट शर्ली व क्रुज मार्क यांच्याशी व्हॉटसअप द्वारे संपर्क केला असता त्यांनी तुमच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम जमा झालेली नाही. असे सांगितल्याने फिर्यादी यांना त्यांची वरील आरोपींनी फसवणुक केली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी शर्ली, क्रुज मार्क, व्हाट्सअप ग्रुप एडमीन, एनालिस्ट व इतर अज्ञाय व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक खानापुरे पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांनी सतर्क राहून ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल द्वारे लोण, केवायसी अपडेट, यासाठी येणारे फोन, व्हाट्सअप व मोबाईलवर येणारे टेक्स्ट मेसेज, लिंक ह्या ओपन करू नये व त्यामध्ये सांगितलेले फॉर्म अथवा माहिती भरू नये

पुणे सायबर क्राईम पोलीस निरीक्षक खानापुरे यांचे नागरिकांना आवाहन