दौंड :
दौंड तालुक्यातील राहू येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याची सुमारे 3 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी माणीक सोपान शिंदे (रा.राहु ता.दौंड जि.पुणे) यांनी आपल्या मोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशनची माहिती वाचली आणि आपणही आपल्या भागात चार्जिंग स्टेशन सुरू करावे अशी कल्पना त्यांना सुचली त्यामुळे त्यांनी माहितीच्या खाली दिलेला फॉर्म भरून त्यांनी संबंधित कंपनीला पाठवला होता.
काही काळात शिंदे यांना रिया नामक मुलीचा मोबाईल फोन आला आणि तिने संबंधित कंपनीची माहिती देऊन तुमच्या जागेत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बसविण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले व असून प्रोसेसिंग फी म्हणून अगोदर 9 हजार रुपये भरा असे सांगितले. पुन्हा दुसऱ्या दिवशी इशिका नावाच्या मुलीचा त्यांना फोन आला व तुमचे चार्जिंग स्टेशन मंजूर झाले असून त्यासाठी लागणारी 91 हजार 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पुन्हा Rtgs करून सर्व पैसे भरल्यानंतर कपिल कोहली नामक व्यक्तीचा फोन आला आणि त्याने व त्याची सहकारी महिला स्वाती यांनी फिर्यादी यांना डिस्कोम लायसंसाठी 1 लाख 42 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपला व्यवसाय सुरू होईल या आशेने तीही रक्कम rtgs ने त्यांच्या खात्यावर भरली. त्यानंतर कोहली याने त्यांना तुमचे लायसन्स आता दोन-तीन दिवसांत येईल आणि आमचे लोक सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे येतील असे म्हणून त्यांना दोन तीन दिवसांनी पुन्हा फोन करून 1 लाख 50 हजार रुपये ट्रांजेक्शन टॅक्स भरण्यासाठी सांगितले. यावर फिर्यादि यांनी हे पैसे आता कशासाठी भरायचे आहेत, तुम्ही तर म्हणाले होते की आता पैसे भरावे लागणार नाहीत थेट ऍग्रिमेंट केले जाणार आहे, त्यावर कपिल कोहली नामक व्यक्तीने त्यांना जोपर्यंत तुम्ही हि रक्कम भरत नाही तोपर्यंत तुमचे ऍग्रिमेंट होणार नाही असे बोलून फिर्यादी यांनी पैसे भरण्यासाठी दबाव आणला. यावेळी फिर्यादी यांनी हे मी शेवटचे पैसे भरतोय पुन्हा भरणार नाही. मला ऍग्रिमेंट करून घ्या, आणि तुमची टीम सर्वेसाठी पाठवा असे म्हणून पुन्हा दीड लाख रुपये त्यांनी आरटीजीएस केले.
यानंतर दोन दिवसांनी सत्यंद्रकुमार गौतम या व्यक्तीचा फोन आला आणि ते या सर्वांचे सिनियर आहेत असे फिर्यादि यांना सांगितले गेले. त्यावेळी सत्यंद्रकुमार गौतम या व्यक्तीनेही त्यांना दीड लाख रुपये भरण्यास सांगितले मात्र फिर्यादी यांनी आम्ही अगोदरच इतके पैसे भरले आहेत आता आम्ही अजून असेच पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. यावर फिर्यादी यांना कपिल कोहलीचा पुन्हा फोन आला आणि त्याने तुम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दीड लाख रुपये भरा असे सांगितले यावर फिर्यादी यांनी तुम्ही ऍग्रिमेंट करायला या किंवा आम्हाला बोलवा आम्ही येतो, तेथे तुम्हाला पैसे देऊ पण तुम्ही आत्तापर्यंत आमच्याकडून जवळपास 4 लाख रुपये घेतले आहेत आणि अजूनही कोणतेच कागदपत्र न देता पुन्हा पैसे मागताय हे बरोबर नाही असे म्हणताच कपिल कोहली या इसमाने फिर्यादी शिंदे यांना तुम्हाला अगोदर पैसे पाठवावे लागतील तरच तुमचे ऍग्रिमेंट होईल आणि लोक स्पॉटवर येतील असे म्हणत जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुम्हाला आम्ही फ्रॉड केसमध्ये गुंतवू आणि तुम्हाला आता आमच्याकडून कोर्टाची नोटीस येईल असे म्हणून धमकी दिली. यावेळी मात्र शिंदे यांना आपली फसवणूक केली जात असल्याची शंका आली आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून वरील 3 महिला व 2 इसम वल त्यांचे मोबाईल क्रमांक देऊन त्यांची फसवणुक करण्यात आल्याची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पो.नि. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तावरे मॅडम या करत आहेत.