Categories: सांगली

‘टेंभू’ ची स्वप्नपूर्ती आणि विटेकरांचा एकच जल्लोष, एकमेकांना साखर वाटून केला जल्लोष

सुधीर गोखले

सांगली : बऱ्याच कालावधीनंतर सांगली जिल्ह्यातील ‘टेंभू’ योजनेचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने काल विटेकरांनी एकच जल्लोष केला. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ‘टेंभू”च्या सुधारित तिसऱ्या टप्प्यास मान्यता देण्यात आली.

विट्यामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार अनिल बाबर गटाने नागरिकांना साखर भरवून एकच जल्लोष केला. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक वैभव पाटील यांच्याही गटाने या टेम्भूच्या मंजुरीचे जल्लोषी स्वागत केले. तर भाजप च्या खासदार संजय पाटील गटानेही उत्फुर्त स्वागत केले. यावेळी आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी आमदार अनिल बाबर यांना या योजनेच्या मंजुरीचे श्रेय दिले. आमदार बाबर यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्याची भावना व्यक्त केली.

खा.संजय पाटील गटाच्या शंकर मोहिते यांनी खासदार संजय पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या पायऱ्या झिजवत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले.
विट्यामध्ये ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात अली तर नागरिकांना यानिमित्त साखर तर काही ठिकाणी पेढेही वाटप झाले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago